Monday, November 30, 2009


आकर्णणे- उक्रि. ऐकणे, श्रवण करणे, लक्ष देणे

आकोचणे- क्रि. मिटणे

आखुंदळणे- सक्रि. हासडणे, हलवणे, वरखाली करणे (तांदूळ सारखे धुतले जाण्यासाठी किंवा भाजीतील पदार्थ सारखे होण्यासाठी)

आखरेखणे- सक्रि. तरतूद करणे, सांभाळणे

आंगडणे- क्रि. अंगास आळोखे-पिळोखे देणे

फिरा फिरा आणि फिरतच रहा.....

कुठे फिरायचं?..............जगाच्या पाठीवर कुठेही !

काही ठिकाणं आपल्याला आवडतात..काही ठिकाणी जाण्याची इच्छा असते..काही ठिकाणांची माहितीच नसते..काही ठिकाणं अजिबात आवडत नाहीत पण त्या न आवडण्यामागेही काही कारणं असतात अशा अनेक दृष्टिकोनातून हा प्रवासाविषयीचा, परिचित आणि अपरिचित अशा पर्यटनस्थळांची माहिती देणारा किंवा संकेतस्थळांचा दुवा देणारा माझा लेख.


१. प्रतापगड महाबळेश्वर परिसर दर्शन- प्र. के. घाणेकर
२. चिनीमाती- मीना प्रभू
३. मेक्सिकोपर्व- मीना प्रभू
४. तुर्कनामा- मीना प्रभू
५. ग्रीकांजली- मीना प्रभू
६.

Thursday, October 22, 2009

मराठीतील अपरिचित शब्द आणि क्रियापदे

कोशांचे वाचन करणे ही माझ्या आवडीची गोष्ट. महाराष्ट्र शब्दकोश वाचताना माझ्या असं लक्षात आलं की ह्यातील कितीतरी शब्द आणि विशेषतः क्रियापदे आपल्या वापरातच नाहीत. म्हणजे मुळात मराठीत शब्द किंवा क्रियापद आहे आणि वापरात नसल्यामुळे आपल्याला माहितच नाही ....किती दुर्दैवाची गोष्ट आहे ही ! म्हणूनच मी ठरवलं की अनेक कोशांत आढळलेले अपरिचित शब्द आणि क्रियापदे लोकांपर्यंत पोहचवायची. हे करताना त्या त्या कोशाचा संदर्भ मात्र नक्कीच द्यायचा. ह्या ब्लॉगवरील अगदी बोटावर मोजण्याइतके शब्द जरी लोकांनी वापरायला सुरवात केली तरी माझा हा प्रयत्न सफल झाला आणि ह्या कोशकर्त्यांच्या कार्यांचे चीज झाले असेच मी समजेन.